। आंबेत । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील खामगावनजीक पॅजिओ रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे कणघर शाखा प्रमुख संतोष सावंत हे आपल्या ताब्यातील पियाजियो रिक्षा घेऊन गोरेगाव दिशेकडे जात होते. यावेळी म्हसळा-गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान त्यांच्या रिक्षाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे वेगात असलेली रिक्षा रस्त्याच्या कडेला आदळली. या अपघातामध्ये रिक्षाचालक संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवासी शांताराम काळीदास धोकटे व शर्मिलाबाई तुकाराम धोकटे हे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
खामगाव येथे रिक्षाचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
