तीन लॅपटॉप, एका मोबाइलची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

पावसामुळे फुगलेल्या दरवाजाला कडी लागत नसल्यामुळे दरवाजा उघडा ठेवून झोपणे अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना महाग पडले आहे. चोरट्यांनी घरातून तीन लॅपटॉप व एक मोबाइल घेऊन पळ काढला आहे.

खारघरमधील सरस्वती अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेणारे चार विद्यार्थी बेलपाडा सेक्टर 3 मधील मोर्या दिषा या इमारतीमध्ये वास्तव्य करतात. पावसाळा सुरू झाल्यामुळे घराचा दरवाजा फुगला असून त्याची कडी व लॅच लागत नाही. रात्री दरवाजा पुढे ढकलून झोपले असताना चोरट्यांनी घरातील तीन लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात उघड्या दरवाजामधून घरात प्रवेश करून मोबाइल व लॅपटॉप चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी पहाटेच्यावेळी घराबाहेर जाताना किंवा घरात किचनमध्ये काम करत असताना घराच्या दरवाजाची कडी लावली जावी. दरवाजाचा कडी, कोयंडा खराब झाला असल्यास तो दुरुस्त केला जावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, शहरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे

Exit mobile version