महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. नवी दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमध्ये 25 ते 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

महापारेषणच्या जनसंपर्क विभागाची विविध पुरस्कारासाठी निवड करताना अधिकारी व कर्मचारी यांच्या अंतर्गत व बाह्य संपर्कासाठी केलेले उपक्रम, महापारेषण समाचार या गृहमासिकात केलेले डिजिटल बदल, क्यू-आर कोड, पॉडकास्टचा सकारात्मक पद्धतीने केलेला वापर आदींची दखल घेण्यात आली आहे. नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, महापारेषणने ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी आदी फिल्ममध्ये ॲनिमेशनचा वापर करून दाखवली आहे. या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे.

निर्मितीक्षम कामांवर भर
महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, सुनील सूर्यवंशी, अशोक फळणीकर, सुगत गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदींच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभाग सातत्याने सर्जनशील व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. यंदाची दैनंदिनी व दिनदर्शिका पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपात असणार आहेत. तसेच लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजिन्सच्या माध्यमातून ङ्गमहापारेषण समाचारफच्या अंकाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे, असे महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी सांगितले.
Exit mobile version