भीषण अपघात! एकाच कुटुंबातील तिघे ठार

। चंद्रपूर । प्रतिनिधी ।

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात घडला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर एक सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात चंद्रपूर-नागपूर महामार्गावर मंगळवार 31 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडला. सतीश नागपुरे हे कुटंबासह जेवण करून नातेवाईकांकडे जात होते. मात्र दुचाकीवरून जात असतानाच हायवेवर समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश भाऊराव नागपुरे (51), मंजुषा सतीश नागपुरे (47) व माहिरा राहुल नागपुरे (3) या तीन जणांचा मृत्यू झाला. तर, स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी ट्रकचालक नंदू चव्हाण याला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version