| नाशिक | प्रतिनिधी |
सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळे येथील घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयित अमोल लांडगे याने तिघा शाळकरी मुलांना शेजारच्या विहिरीत कासव असल्याचे सांगितले आणि विहिरीत ढकलून दिले. त्यातील एकाने विहिरीतील दोरीला पकडून स्वतः सावरत इतर दोघांचा जीव वाचवला. या प्रसंगातून वाचून घरी आल्यानंतर या मुलांनी घरी आई-वडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. सिन्नर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे या संशयिताला घेतले असून, अधिक तपास सुरू आहे. तिघा शाळकरी मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत लोटून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.