तीन वाहनांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

। पुणे । वृत्तसंस्था ।

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात तीन वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सकाळी सातच्या सुमारास तीन वाहने एकमेकांना धडकून हा अपघात झाला आहे. यात कंटेनर, गॅस टँकर व कार कंटेनर एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये गॅस टँकरमधील चालक अक्षय व्यंकटेश ढेले (30) हा गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. तर, अपघातात कारणीभूत असलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच, मृताला खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल केले.

Exit mobile version