पाल्यांच्या स्पर्धेसाठी पालकांवर प्लास्टिक गोळा करण्याची वेळ

। पनवेल । दीपक घरत ।
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून शाळांमध्ये सुका कचरा संकलन पासबुक योजना राबवण्यात येत आहे.या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना घरांतील टाकाऊ प्लास्टिक शाळेत जमा करण्यास सांगण्यात आले आहे.जास्तीत जास्त प्लास्टिक जमा करणार्‍या विध्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. सर्वात जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे.पालिकेच्या या घोषणेमुळे जास्तीत जास्त टाकावू प्लास्टिक जमा करण्याची विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. या प्लास्टिक जमा करून देण्यासाठी विद्यार्थी पालकांकडे हट्ट करत असल्याने पाल्याला जास्त प्रमाणात प्लास्टिक जमा करून द्यायचा कसा असा पेच पालकांनसमोर निर्माण झाला आहे.

प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी पालिकेच्या वतीने सुका कचरा संकलन पासबुक योजना शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत चारही प्रभागांमधील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या घरांतील टाकाऊ प्लास्टिक शाळेच्या माध्यमातून गोळा केले जात आहे.दोन महिन्या पासून सुरु असलेल्या या योजनेला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

या दोन महिन्यात कळंबोली प्रभागामध्ये कारमेल शाळेने सर्वांत जास्त म्हणजे 339 किलो प्लास्टिक गोळा केल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.युनिसेफ आणि सीएसीआर कंपनीच्या मार्फत शाळान मधील हे प्लास्टिक गोळा केले जात आहे.या गोळा केलेल्या प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून पुर्नवापर करून तयार करण्यात येणार्‍या शालेय वस्तू या पुन्हा त्या शाळांनाच देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पालिकेच्या योजनेत सहभागी शाळांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा मंगळवारी ( ता.6) निकाल जाहीर करण्यात आला ज्यामध्ये कळंबोली प्रभागातून कारमेल शाळेत सर्वात जास्त 339 किलो प्लास्टिक संकलित करण्यात आले आहे.पनवेल प्रभागामधून केईएस इंग्लीश मिडीयम स्कुलमधून 110 किलो तसेच खारघरमधील अपेजॉय स्कूलमधून 101 किलो तर कामोठे प्रभागामधून मराठी जिल्हा परिषद शाळेमधून सर्वांत जास्त प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे या सर्व शाळांमधील सर्वात जास्त प्लास्टिक जमा करणार्‍या विध्यार्थ्यांची क्रमवार नावे देखील पालिके तर्फे जाहीर करण्यात आली आहेत.

पालिकेच्या योजनेत सहभागी शाळांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा मंगळवारी ( ता.6) निकाल जाहीर करण्यात आला ज्यामध्ये कळंबोली प्रभागातून कारमेल शाळेत सर्वात जास्त 339 किलो प्लास्टिक संकलित करण्यात आले आहे.पनवेल प्रभागामधून केईएस इंग्लीश मिडीयम स्कुलमधून 110 किलो तसेच खारघरमधील अपेजॉय स्कूलमधून 101 किलो तर कामोठे प्रभागामधून मराठी जिल्हा परिषद शाळेमधून सर्वांत जास्त प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे या सर्व शाळांमधील सर्वात जास्त प्लास्टिक जमा करणार्‍या विध्यार्थ्यांची क्रमवार नावे देखील पालिके तर्फे जाहीर करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांचा प्लास्टिक हट्ट
योजनेत सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांना दर गुरुवारी शाळेत टाकाऊ कचरा जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये इतर शाळेतील इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी या कचरा गोळा करण्याच्या या स्पर्धेतही आपण जास्तीत जास्त गुण मिळवावेत या साठी धडपडताना दिसत असून, पालकांनी जास्तीत जास्त सुका कचरा गोळा करून द्यावा या साठी हट्ट करून बसत असल्याची माहिती विठ्ठल पाटील या पालकाने दिली आहे.

योजना राबवा स्पर्धा नको
पालिका राबवत असलेली योजना चांगली आहे. पालिकेने ही योजना जरूर रबवावी. कचरा वर्गीकरण करण्यासाठी विध्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. मात्र सुका कचरा जमा करण्याची स्पर्धा घेऊ नये असे मत शुभांगी पटेल या पालकाने व्यक्त केली आहे.

पालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या या योजनेत पालिका क्षेत्रातील जवळपास दीडशे शाळांमधील 5 वी ते 9 वी इयत्तेमधील विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवला आहे.

डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त

कचर्‍याची विल्हेवाट कशी लावली जाते.घरात कचर्‍याचे वर्गीकरण कसे केले जाते या बाबत विध्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणे पालिका आणि शाळेकडून अपेक्षित आहे

वैभव महाडिक. पालक संघटना

पालिका राबवत असलेली योजना चांगली आहे. अशा योजना राबवणे गरजेचे आहे. मात्र विद्यार्थ्यानी याकडे स्पर्धा म्हणून पाहणे अपेक्षित नाही.विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या प्लास्टिकच कुठे आणि कस विघटन करण्यात येत हे देखील त्यांना दाखवले गेले पाहिजे.

विद्या मोहिते. पालक.
Exit mobile version