गाढी नदीत मसाल्याची पाकिटे टाकून इसम पसार

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-माथेरान रोड फायर रेंजच्या समोर गाढेश्‍वरच्या बाजूला व गाढी नदीमध्ये वाजे हद्दीत तारीख संपलेली मसालाची पॉकेट अज्ञात सर्माकडून टाकण्यात आलेली आहेत, यामुळे नदीतील मासे, आजूबाजुच्या गावातील गुरे, ढोरे यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. पनवेल तालुक्यातील गाढी नदीचा कचरा, घाण, वेस्टेज मटेरियल, ई-गारबेज टाकून गळा घोटण्यात आलेला आहे. गाढी नदीत मसाल्याची पॉकिट टाकण्यात आली आहेत. याबाबत पनवेल नेरे, मनसे आक्रमक झाली आहे. हे कृत्य करणार्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मनसेचे पनवेल उप तालुका अध्यक्ष दिनेश मांडवकर, विश्‍वास पाटील नेरे विभाग अध्यक्ष, अमेय गांगण, महाराष्ट्र सैनिक, अशोक पाटील वाजे, विजय पाटील ग्रामस्थ यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

Exit mobile version