| आगरदांडा | प्रतिनिधी |
केअरयु हेल्थ केअर पंचवटी नाशिक व मुरुड ठाण्याच्या वतीने हृदय विकार पुरुषांसाठी व थायरॉईट गर्भ पिशवी (महिलांसाठी) मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी डॉ.समिर मुन्सी, पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, डॉ. चांदणी पोटकुळे, विक्रांत बांधणकर, सागर रसाळ, सुरेश वाघमारे, सचिन वाणी, दिपक राउळ, लव गोंधळी, युवराज निकाले, जागन वाघरे, किसन बळी,एकंदरा व मुरुडचे समाजाचे महिला व पुरुष उपस्थित होते.या शिबिरात 60जणांनी सहभाग नोंदविला.