। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यातील तिलारी भूंकपप्रवण क्षेत्रात मध्यरात्री 3.2 रिष्टर स्केल भूकंप धक्क्यांची नोंद झाली आहे. यासंदर्भात, तिलारी भूकंप वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांनी, या सौम्य धक्क्यांची नोंद झाली असली, तरी तिलारी क्षेत्रात हे धक्के जाणवले नसल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात रविवार रोजीच्या मध्यरात्री काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. कोकण पट्ट्यातील देवरुख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील आंतरराज्य असलेल्या तिलारी धरण क्षेत्रात सुद्धा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. याची तीव्रता 3.2 रिष्टर स्केल एवढा कमी असल्याने तो तिलारी क्षेत्रात जाणवला नाही.
तर चांदोली धरण व परिसरात 3.2 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभाग वारणा चे शाखाधिकारी टी. एस.धामणकर यांनी दिली. यानुसार, या धक्क्यांचा केंद्रबिंदू 18.2 किलोमीटरवर अंतरावर आहे. या भूकंपाच्या धक्क्यांचे स्वरूप सौम्य स्वरूपात असल्याने संबंधित परिसरात कोणतीही आर्थिक अथवा जिवितहानी झालेली नाही.