| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह आणि राष्ट्रभक्तीचा प्रचंड जोश पाहायला मिळाला. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. देशभक्तीची भावना नागरिकांच्या मनात अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. हातात तिरंगा झेंडा, देशभक्तीपर गीते आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
सुधागड पालीचा परिसर राष्ट्रभक्तीने दुमदुमला
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘तिरंगा रॅली’ अभियान राबविण्यात येत आहे. या देशव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून गुरुवारी दि. (13) सुधागड पाली येथे भव्य पायी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. बल्लाळेश्वर मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिकांनी हातात तिरंगा घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्सव प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा ठरावा, तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महापुरुषांचे योगदान आणि राष्ट्राच्या एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या तिरंगा रॅलीत सुरेश खैरे, प्रकाश देसाई, गिता पालरेचा, शर्मिला बोडके, चंद्रकांत वारगुडा , जागृती मानकर, संदेश शेवाळे, प्रणिता परदेशी, पराग मेहता, सुलतान बेणं सेकर, तहसीलदार उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी, प्राचार्य डॉ. लहुपचांग, दादा घोसाळकर, सुधीर भालेराव, कल्याणी दपके, आलाप मेहता, अरिफ मनियार, आशिफ मनियार, श्रीकांत ठोंबरे, प्रणाली शेठ, नरेश खाडे, सुशील शिंदे, सुजित बारस्कर, सुनिल राऊत, ललित ठोंबरे, रोहन दगडे, महंम्मद भाई धनसे, रोशन चाफेकर, वैभव कुलकर्णी, आदिसह कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड शहरात देशभक्तीचा जागर
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाड, पोलादपूर, गोरेगाव, निजामपूर येथील भारतीय नागरिकांच्या वतीने महाड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजत करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये महाडचे तहसीलदार महेश शितोळे, विपीन महामुनकर, महेश शिंदे, अमित मोरे, प्रमोद महाडीक, संकेत वारंगे, आशीष फळसकर, महाड शहर पोलीस निरीक्षक नारायण इकशिंगे, व कर्मचारी, तसेच महाड नगरपरिषद शाळांमधील शिक्षक व विद्यर्थी सहभागी झाले.

याशिवाय एम. एम. जगताप कॉलेज आणि कोएसोच्या वि. ह. परांजपे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. हातात तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. ‘वंदे मातर, भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी संपर्ण महाड शहर दुमदुमुन गेले. रॅलीदरम्यान नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. तर रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी देशभक्तीपर घोषणा देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिमाखात केला. तिरंगा रंगांनी सजलेले शहर आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेला जनसमुदाय यामुळे महाडमध्ये देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.






