। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिकमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. याबाबत मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
नाशिकमधील देवळा तालुक्यात गुरुवारी हि दुर्दैवी घटना घडली. निंबोळा येथील शेतकरी बळीराम देवराम देवरे (50) यांची दोन एकर जमीन आहे. त्यांच्यावर मालेगाव येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे 15 लाख रुपये तसेच एका वित्तीय संस्थेचे 17 लाख रुपये असे एकूण 32 लाख रुपयांचे कर्ज होते. मात्र, शेतीमालाला भाव नसल्याने देवरे हे कर्ज फेडू शकले नाहीत. या कर्जाला कंटाळून त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.