छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

। नाशिक । प्रतिनिधी ।

नाशिकच्या देवळाली गावात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून पीडित मुलीने विषारी औषध घेऊन जीवन संपवलं. याबबत नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगी देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयात शिकत होती. रस्त्याने जाता-येता आरोपी तिला छेडत होता. तसेच त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीकडे लग्नाचा तगादा लावला असल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला. या त्रासाला कंटाळून मुलीने विषारी औषध घेतलं. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आले.

Exit mobile version