मरावे परी आवयवरुपी उरावे

ताराबाईच्या अवयव दानाने अनेकांना जीवदान

| पनवेल । वार्ताहर ।

अन्न दानामुळे पोटाची भूक भागवली जात होती त्यामुळे काल-परवा पर्यंत अन्न दान हे श्रेष्ठदान असेच समजले जात होते. परंतु अवयवदान केल्याने भूख नव्हे तर जीवनदान मिळत असते, त्यामुळे अवयवदान हेच श्रेष्ठदान आहे. स्व.ताराबाई केसरीनाथ म्हात्रे यांनी मृत्यू नंतरही अनेकांना अवयवदानातून जीवनदान दिल्याने दुखातही कोणाला तरी जीवनदान मिळाल्याचा समाधान कुटुंबियांना मिळत आहे.

त्यांचे 10 अवयव दान केल्याने 10 जनांचे जीव वाचणार आहेत. ताराबाई वय 59, रा. बामणडोंगरी, उलवे नोड, ता. पनवेल, यांचे मंगळवार, (दि. 6) निधन झाले. ताराबाई घरात पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून जखमी झाल्या होत्या, त्यानंतर त्यांना उलवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी सानपाडा येथील एम.पी.सी.टी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर हॉस्पिटलमध्ये ताराबाई यांची प्रकृती खालावून त्यांचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. त्यांनतर कुटुंबीयांनी ताराबाई यांना एम.जी.एम. हॉस्पिटल वाशी येथे निधन झाले.

यावेळी पती केसरीनाथ म्हात्रे, मुलगा अमर व संदीप मुलगी यांनी ताराबाई यांचे अवयवदान करण्याचा धाडशी निर्णय घेऊन मृत्यू नंतरही अनेकांचे जीव वाचवण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला.

Exit mobile version