| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतीय महिला क्रिकेट टीमने दुसर्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडवर विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघाने सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधलीये. मात्र असं असूनही भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे स्लो ओव्हर टाकल्याप्रकरणी टीम इंडियाला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
हा दंड ठोठावल्यामुळे भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या 20 टक्के दंड भरावा लागणार आहे. आयसीसीकने सोमवारी भारतीय टीमवर ही कारवाई केली आहे.
भारतीय महिला टीमला निर्धारित वेळापेक्षा मागे होती. यामुशे सामना रेफरी फिल विटिक्सने संघाला शिक्षा सुनावली आहे. दरम्यान यासंदर्भात कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या कारणास्तव औपचारिक सुनावणीची आवश्यकता नाही. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, ओव्हरची गती कमी राखल्याबद्दल खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के दंड आकारला जातो.