शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आजची सुनावणी उद्यावर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

बुधवारी शिवसेनेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करत शिवसेनेच्या वतीने कोर्टात दाद मागितली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी कुणाला मिळणार, यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार होती. पण ही सुनावणी आजऐवजी आता उद्यावर ढकलली गेली आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भात उद्या (शुक्रवारी) दुपारी सुनावणी पार पडेल. सोबत शिवसेना सुधारित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यानंतर हायकोर्टात पार पडणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Exit mobile version