तोंडसुरे आगरीगावाचा शिंदे गटात प्रवेश

| म्हसळा | वार्ताहर |

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असतांनाच बाळासाहेब शिवसेना पक्षांनी आपली ताकद वाढवत पक्ष प्रवेश करण्याचा झपाटाच लावला आहे. आ.भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख प्रसाद बोरले व अमोल पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा शासकीय विश्राम गृहात प्रवेश प्रवेश घेण्यात आला.

यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चालके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसलकर, माणगाव तालुका प्रमुख महेंद्र माणकर, नगराध्यक्ष माणगाव ज्ञानदेव पवार, श्रीवर्धन संपर्क प्रमुख पाटेकर, म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोरले, श्याम भोकरे, संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, उपतालुका प्रमुख बाबु बनकर, दिपेश जाधव, अरविंद शिंदे, म्हसळा शहर प्रमुख अमर करंबे, नामदेव घुमकर, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, महिला अध्यक्षा सुनंदा पाटील व त्यांचे सर्व सहकारी पदाअधिकारी उपस्थित होते.

यावेळी तोंडसुरे गावातील हरिचंद्र नाक्ती, धर्मा नाक्ती, बाळकृष्ण नाक्ती, वसंत नाक्ती, नथुराम भायदे, गोविंद भायदे, धर्मा भायदे, हरी भायदे, मनोज नाकती, रघुनाथ भायदे, रघुनाथ नाक्ती, उमेश नाक्ती, अनंत नाक्ती, सुरेश नाक्ती, वामन नाक्ती, पवन नाक्ती यानी शिंदे गटात प्रवेश केला. सकलप मधील विजय लोणशिकर, सुरेश लोणशिकर, नामदेव घुमकर, अरविंद कांबळे यांनीही पक्षप्रवेश केला. याशिवाय तोराडीतील सलाम हजवाने, रामा पवार, रमेश पवार, बाबु पवार, फैसल हजवाने, शभु मुखने, शादीक हजवाने, लियाकत हनवाने, खलिल हतवाने, मजिद हजवाने यांनीही शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version