उद्या माणगाव नगरपंचायत हळदीकुंकू

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समितीच्या विद्यमान सभापती तथा नगरसेविका नंदिनी बामगुडे व समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका शर्मिला सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.6) सायंकाळी 5 ते 7 यावेळेत हळदीकुंकू समारंभाचे आयोजन माणगाव नगरपंच्यात पटांगण येथे करण्यात आले आहे.

माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे दरवर्षी नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात हळदीकुंकू समारंभाचे दिमाखदार पद्धतीने भव्य आयोजन केले जाते. दरवर्षी नागरपंचातीच्या या हळदीकुंकू समारंभाला हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती असते. यावर्षीही नागरपंचातीच्या या हळदीकुंकू समारंभाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका नंदिनी बामगुडे व विद्यमान नगरसेविका शर्मिला सुर्वे, रिया उभारे, ममता थोरे, हर्षदा काळे, रश्मी मुंढे, सुविधा खैरे, लक्ष्मी हिलम व सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

Exit mobile version