• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Child Scientist: ग्रह-ताऱ्यांत रमलाय उद्याचा बालवैज्ञानिक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 16, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Child Scientist: ग्रह-ताऱ्यांत रमलाय उद्याचा बालवैज्ञानिक
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अवघ्या पाचव्या वर्षी अंतराळ जिंकण्याचे स्वप्न!; अलिबागच्या आयान पाटीलची जागतिक स्तरावर दखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

खेळण्याच्या वयात अनेक मुले गाड्या, बाहुल्या किंवा कार्टूनमध्ये रमलेली असतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील अलिबागचा अवघा पाच वर्षांचा आयान नितीन पाटील ग्रह, उपग्रह, ब्लॅक होल, सुपरनोव्हा, रॉकेट आणि उपग्रह निर्मितीच्या स्वप्नात रमला आहे. तीन वर्षांच्या वयापासून सुरू झालेली त्याची अंतराळाविषयीची ओढ आज जागतिक स्तरावरील स्पर्धा, वेबिनार, ऑलिम्पियाड आणि संशोधन उपक्रमांपर्यंत पोहोचली आहे. जिज्ञासा, सर्जनशीलता आणि आई-वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे अलिबागच्या या चिमुकल्याची भरारी आता अंतराळ विज्ञानाच्या दिशेने सुरू झाली आहे.



पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये वाढलेल्या आयानला अवघ्या तीन वर्षांच्या वयातच अंतराळाविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले. ग्रह, तारे, उपग्रह, रॉकेट, आकाशगंगा आणि विश्वातील रहस्ये जाणून घेण्याची त्याची ओढ दिवसेंदिवस वाढत गेली. विशेष म्हणजे, कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय त्याने स्वतः निरीक्षण, व्हिडिओ, पुस्तके आणि विविध ऑनलाईन माध्यमांच्या साहाय्याने अंतराळाचा अभ्यास सुरू ठेवला. “पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण चंद्राला का ओढून घेत नाही?”, “पृथ्वीचा वेग वाढला तर काय होईल?” असे प्रश्न तो सातत्याने विचारतो. एवढेच नव्हे तर, त्यांची स्वतःच्या पद्धतीने उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न करतो. घरच बनले विज्ञानाचे विद्यापीठ

आयानचे आई-वडील श्रद्धा पाटील आणि नितीन पाटील हे दोघेही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आहेत. त्यांनी मुलाच्या जिज्ञासेला कधीच मर्यादा घातली नाही. उलट, त्याला आवश्यक पुस्तके, साधने, विज्ञानविषयक साहित्य आणि प्रयोगांची संधी उपलब्ध करून दिली. आयानला होमस्कूलिंगद्वारे त्याच्या गतीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विषय समजून घेणे, प्रश्न विचारणे आणि प्रत्यक्ष प्रयोग करणे यासाठी त्याला भरपूर वेळ मिळत आहे.

कोडिंगपासून ग्रहांच्या चित्रांपर्यंत विलक्षण आवड
अवघ्या पाचव्या वर्षी आयानला लॅपटॉप सहज हाताळता येतो. कोडिंगच्या प्राथमिक संकल्पना तो समजून घेत आहे. काँक्रीट मिक्सर आणि टॉवर होइस्ट यांसारख्या यंत्रणांबाबत त्याने साधे प्रोग्राम तयार केले आहेत. चार वर्षांचा असतानाच त्याने पृथ्वी, मंगळ, गुरु आणि नेपच्यून या ग्रहांची कॅनव्हास चित्रे स्वतःच्या कल्पनेतून रंगवली. गुरु ग्रहावरील प्रसिद्ध ग्रेट रेड स्पॉटदेखील त्याने अचूक दाखवला. प्रदर्शन म्हणजे काय हे समजल्यानंतर त्याने स्वतःच घरात छोटेखानी चित्रप्रदर्शन भरवून आपल्या कलाकृतींचे सादरीकरण केले.
नवी पृथ्वीची भन्नाट संकल्पना
आयानने स्वतःच्या कल्पनेतून “नवी पृथ्वी” ही संकल्पना मांडली आहे. दोन सूर्य, पाच चंद्र, कमी गुरुत्वाकर्षण आणि सतत पावसाचे संकेत देणारा हिरवा वादळपट्टा असलेला ग्रह त्याने कल्पिला आहे. त्या ग्रहावर ऑक्सिजन असल्याने जीवन शक्य असल्याचा त्याचा तर्क आहे.
राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर दखल
‌‘शी इन स्पेस'च्या वेबिनारमधून प्रेरणा घेत आयानने वेदर स्टेशन तयार करण्याचा प्रयत्न केला. आर्डुइनो, ब्रेडबोर्ड यांसारख्या साधनांचा अभ्यास सुरू केला. आज तो युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) प्रेरित “नवीन पृथ्वी शोधा” या जागतिक स्पर्धेत सहभागी आहे. इंडियन स्पेस टीमच्या रॉकेट्री अभ्यासक्रमासाठी सर्वात लहान विद्यार्थी म्हणून त्याची निवड झाली आहे. इंडियन नॅशनल एरोस्पेस ऑलिम्पियाडसाठी तो पात्र ठरला असून, भारतातील सर्वात लहान सहभागींपैकी एक आहे. एसडीआरओच्या यंग सायंटिस्ट क्लबच्या निवड प्रक्रियेत तो सहभागी असून, भविष्यात नॅनो उपग्रह आणि लघु हवामान केंद्र उभारण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या कार्याची दखल डेलीहंटसह विविध राष्ट्रीय व्यासपीठांनी घेतली असून “शी इन स्पेस” मासिकातही त्याची निवड झाली आहे.
विश्वाचा अभ्यास घरातूनच
आयानने सौरमालेपासून मिल्की वे, अँड्रोमेडा आकाशगंगा, ब्लॅक होल, सुपरनोव्हा, किलोनोव्हा आणि व्हाईट होलसारख्या संकल्पनांपर्यंत अभ्यासाचा विस्तार केला आहे. मंगळ, गुरु, शनीचे प्रमुख उपग्रह तसेच प्लूटो, माकेमाके, सेरेस, एरिस यांसारख्या बटू ग्रहांची माहिती तो सहज सांगतो. चौथ्या वाढदिवसानिमित्त त्याने टेलिस्कोपची भेट मागितली होती. रात्रीच्या आकाशात शुक्र, मंगळ, गुरु ग्रह ओळखणे आणि चंद्राच्या विविध कला पाहणे हा त्याचा आवडता छंद बनला आहे.

मला माझी स्वतःची सायन्स आणि स्पेस लॅब तयार करायची आहे. तिथे मी स्वतः प्रयोग करून रॉकेट, उपग्रह आणि अंतराळाविषयी नवनवीन गोष्टी शिकणार आहे. एक दिवस भारतासाठी मोठे अंतराळ संशोधन करायचे, हे माझे स्वप्न आहे.

आयान पाटील

आयानमध्ये लहानपणापासूनच प्रचंड जिज्ञासा आहे. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याला कोणत्याही चौकटीत न अडकवता त्याची आवड जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलांच्या प्रश्नांना वेळ देणे आणि त्यांना योग्य दिशा देणे, हेच त्यांच्या विकासाचे खरे बळ आहे.

श्रद्धा पाटील
(आई)


आयानला विज्ञानाची आवड आहे, हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला आवश्यक साधने, पुस्तके आणि शिकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्याने स्वतःच्या जिज्ञासेच्या जोरावर हा प्रवास सुरू केला आहे. त्याची स्वप्ने मोठी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम त्याच्या पाठीशी उभे राहू.

नितीन पाटील
(वडील)

Related

Tags: alibag newsChild ScientistChild Scientist Ayan Patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नाटकातून कृषीविषयक जागरूकता

Next Post

रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीची बर्बादी?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?
कर्जत

आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?

July 16, 2026
नगरपरिषदेत पुन्हा रंगला 9-12 खेळ
उरण

नगरपरिषदेत पुन्हा रंगला 9-12 खेळ

July 16, 2026
खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप
sliderhome

खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप

July 16, 2026
सव्वा सहा कोटींची खारबंदिस्ती पहिल्याच पुरात खचली?
sliderhome

सव्वा सहा कोटींची खारबंदिस्ती पहिल्याच पुरात खचली?

July 16, 2026
रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीची बर्बादी?
रायगड

रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीची बर्बादी?

July 16, 2026
Next Post
रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीची बर्बादी?

रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीची बर्बादी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?