मुसळधार पावसाने चौल जलमय; रस्ते, शेती पाण्याखाली

| चौल | प्रतिनिधी |


शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग तालुक्यातील चौल परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले असून, पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत आहे. त्यामुळे काही अंतर्गत मार्ग बंद झाले असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


परिसरातील शेतीही पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या भरावांमुळे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी वस्त्या, रस्ते आणि शेतांमध्ये साचत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Exit mobile version