| राजापूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील काजिर्डा येथे एका 22 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून, ती काही आठवड्यांची गरोदर राहिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजिर्डा गावी ही घटना घडली आहे. ही मुलगी बावीस वर्षीय असून, ती मतिमंद आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले असून, घरात आईसह ती रहाते. ही मुलगी मतिमंद असल्याने तिचा गैरफायदा अज्ञाताने घेतला. या मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती काही आठवड्यांची गरोदर राहिल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. राजापूर पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप अज्ञात आरोपीला अटक झालेलीनसून, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करीत आहेत.