आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरामध्ये बालिकेवर अत्याचार होण्याची घटना घडली आहे.याप्रकरणी आरोपी व्यक्तीविरूध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
पोलादपूर शहरातील मराठी मुलांची शाळा तसेच कन्या शाळेलगत एक टपरी आहे. या टपरीचालकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिग अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यास भेट देऊन या तपासकामी मार्गदर्शन केले. सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी याप्रकरणी स्वत: तपास हाती घेऊन टपरीचालक आरोपी अनंत यशवंत दरेकर (वय 63, पोलादपूर) याच्याविरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.