काशीद-चिकणी समुद्र किनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू

। मुरूड । वार्ताहर ।
चिकणी समुद्रकिनारी सायंकाळच्या वेळी पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन नंदकुमार शांडिल्य (वय ४७ वर्षे) हा पर्यटक बावधन पुणे येथील आहे. सदर पर्यटकाला मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सदर घटनेची नोंद मुरुड पोलीस ठाण्यात पो. ना. सागर रोहेकर यांनी केली आहे. या घटनेचा तपास सहा. फौ. वाणी करत आहेत. तर मरणोत्तर पंचनामा पी. एस. आय. खुतीजा शेख यांनी केला. या घटनेचा तपास पो.नि. अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version