पर्यटक मार्गदर्शकामुळे पर्यटन वाढीला चालना

जिल्ह्यात वर्षाभरात 10 लाखापेक्षा अधिक पर्यटक दाखल

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, शिवकालीन गडकिल्ले, धार्मिक स्थळे पर्यटकांना कायमच आकर्षित करीत आले आहेत. या पर्यटन स्थळांन भेटी देण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यटन स्थळी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना बिनचुक माहिती मिळावी यासाठी पर्यटन विभागासह वेगवेगळ्या संस्था, संघटनाचया माध्यमातून पर्यटक मार्गदर्शक तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 80 टयुरिस्ट गाईड्स आहेत. पर्यटक मार्गदर्शकामुळे पर्यटन वाढीला चालना मिळू लागली आहे. जिल्ह्यालावैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील रायगड किल्ला, अलिबागमधील कुलाबा किल्ला, मुरुड जंजिरा किल्ला, सुधागडमधील भोरपगड किल्ला, कर्नाळा किल्ला, रेवदंडा येथील भुईकोट किल्ला,अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य अलिबाग, मुरुड, काशीद, श्रीवर्धन, किहीम, रेवदंडा, नागाव, आक्षी येथील समुद्रकिनारे, फणसाड, आंबोली येथील धरणे, पाली व महड येथील अष्टविनायक मंदिर, अलिबागमधील सरखेल कान्होजी आंग्रे येथील समाधी अशी वेगवेगळी पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना पर्यटक आवर्जून भेटी देतात. जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठे महत्व आहे. जिल्ह्यात वर्षाला सुमारे 10 लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. परंतू जिल्ह्यात असलेल्या गड किल्ल्यांची व अन्य पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी पर्यटक मार्गदर्शकांचा अभाव असल्याने पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती परिपुर्ण मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक व अन्य पर्यटन स्थळांच्या इतिहासापासून पर्यटक वंचित राहत आहेत.

पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळांची अचुक माहिती मिळावी यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेत पर्यटक मार्गदर्शक तयार करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी असलेली धरणे, गड किल्ले, जलदुर्ग याठिकाणी टयुरिस्ट गाईड्स निर्मितीला चालना देण्या सुरुवात केली. गेल्या तीन वर्षापासून या उपक्रमाला वेगात सुुरुवात झाली. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या गावे, वाड्या वस्त्यांमधील तरुणांना रोजगाराचे साधन खुले करण्यात आले. पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबईच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रत्नागिरी व सिंधूदूर्ग तसेच नवी मुंबई येथे पर्यटक मार्गदर्शक निर्मितीसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये दोनशेहून अधिक पर्यटक मार्गदर्शक तयार करण्यात आले. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या युवक-युवतींसाठी पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु तरुण-तरुणींना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन पर्यटन मार्गदर्शक म्हणून घडविण्यात आले.त्यांना ओळखपत्र देण्यात आले. या उपक्रमाला तरुणांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यामध्ये सध्या 80 पर्यटक मार्गदर्शक आहेत. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर असलेल्या पर्यटक मार्गदर्शकांच्या माध्यमातून पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती मिळत आहे. या पर्यटक मार्गदर्शकामुळे गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील पर्यटन वाढीला चालना मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Exit mobile version