रेवदंडा समुद्र किनार्‍याला पर्यटकांची पसंती

सुरक्षीत व स्वच्छ समुद्र किनारा
रेवदंडा | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस रेवदंडा समुद्र किनारी पर्यटक मोठया संख्येने भेट देत असून पर्यकांच्या पसंतीस रेवदंडयातील सुरक्षीत व स्वच्छ समुद्रकिनारा पडला असल्याचेच चित्र दिसते.
कुंडलिका समुद्रखाडी लगत वसलेले रेवदंडा शहरास प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे दोन किमी अंतरापर्यंत सरळ, सुरक्षित व स्वच्छ समुद्र किनारा लाभलेला आहे. रेवदंडा समुद्रात पोहताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडून आल्याचे अद्यापही ी ऐकिवात नाही तसेच समुद्र किनारी स्वच्छ वाळू तसेच येथील झुळझूळ वाहणारा वारा पर्यटकांचे आकर्षण ठरते आहे. या वर्षी दिवाळी सुट्टीत असंख्य पर्यटकांची गर्दी रेवदंडा समुद्र किनारी दिसून येत होती.
रेवदंडा समुद्र किनारी जाणे-येणेस अनेक मार्ग आहेत, त्यापैकी रेवदंडा हायस्कुल येथून पर्यटकांची वाहने जाणे-येणेस सुलभ मार्ग व पार्किग सुविधा आहे तसेच येथे स्थानिकांनी राहण्यासाठी लॉजिगची सोय उपलब्ध केली असून जेवणासह विशेष पाहूणचार सुध्दा पर्यटकांचा केला जातो. रेवदंडा समुद्र किनारी स्पीड बोट, घोडा गाडी, आदीने पर्यटकांना आनंद लुटता येतो, समुद्र किनारा लांब, व सरल असल्याने येथे पर्यटकांना मोकळीक साधता येते, दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी रेवदंडा समुद्र किनारी मोठी गर्दी पर्यटकांची दिसून येते.
रेवदंडा आगरकोट किल्लाच्या तटबंदी नजीक समुद्रकिनारपट्टी व परिसर प्रि-वेडींग फोटोशूट साठी आकर्षण ठरले असून नेहमी येथे मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरासह रायगड मधून अनेक फोटाग्राफर्स फोटो शुटसाठी भेट देतात.स्थानिकांना यामुळे मोठी आर्थिक उत्पन्न हॉटेल, व लॉजिग व्यवसायातून प्राप्त होत आहे. रेवदंडा-चौल मधील शहाळे,चिक्की, तसेच येथील स्थानिकांची ताजी मच्छी पर्यटकांचे पंसतीस उतरले आहे,

Exit mobile version