पर्यटकांनी सावधानता बाळगावी

नेरळ फोटोग्राफर असोसिएशनकडून आवाहन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी येत असतात. त्यातील काही पर्यटक हे हौशी बनून निसर्गाचे नियम डावलतात आणि त्यामुळे अपघात होतात. हे अपघात झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील निसर्ग पर्यटनची बदनामी ठरते. हे सर्व टाळून कर्जत तालुक्यातील निसर्ग पर्यटन बहरावे यासाठी नेरळ फोटोग्राफर असोसिएशनकडून जुम्मापट्टी येथील धबधबा ठिकाणी पर्यटकांना आवाहन करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.

दरवर्षी पर्यटकांचे होणारे अपघात टाळण्यासाठी कर्जत तालुक्यातील महत्त्वाचा धबधबा समजला जाणार्‍या जुम्मापट्टी येथील धबधबा सर्वांना आकर्षित करीत असतो. मात्र, याच जुम्मापट्टी धबधबा येथील खडक हे निसरडे होत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन पर्यटकांनी पाण्यात मौजमजा घेत असताना काळजी घावी, असे आवाहन करणारे फलक नेरळ येथील नेरळ फोटोग्राफर असोसिएशन यांच्याकडून लावले आहेत.

नेरळ फोटोग्राफर असोसिएशनकडून सामाजिक बांधिलकी हेतूने नेरळ परिसरातील धबधब्यांवर सूचना फलक लावून जाहीर आवाहन करण्यात आले. यावेळी नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन केळकर, सचिव दिलीप मसणे, खजिनदार मनोज भोईर यांच्यासह संस्थेचे सल्लागार राजेश विभुते, नितीन म्हसे, दुर्वास सोनावने, प्रेमनाथ माळी, गणेश वेहेले आदी उपस्थित होते. नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे या आवाहनात्मक बॅनरबद्दल नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी धावले यांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version