म्हसळ्यातील शेतकर्‍याला आरडीसीसीतर्फे ट्रॅक्टर कर्ज

। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द येथील प्रगतशील शेतकरी पांडूरंग सुदाम मेंदडकर यांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसळा शाखेतर्फे ट्रॅक्टरसाठी बँकेचे विभागीय अधिकारी संजीव देशमुख यांचे हस्ते लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कर्ज वितरण करण्यात आले.तसेच नवीन वाहनाची चावीही सुपूर्द करण्यात आली.

बँकेच चेअरमन आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच शेती विकासाला प्राधान्य दिले आहे. शुन्य टक्के व्याजदराने देशामध्ये प्रथमच अल्पमुदत पीक कर्जाचे वाटप करणारी ही पहिली बँक ठरली आहे. शेतकरी बांधवांची जिव्हाळ्याची बँक म्हणून प्राधान्य देताना मध्यम व दीर्घ मुदतीसाठी शेतीविकसन कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याबरोबरच घरबांधणीसाठी 60 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर्ज देताना ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. गरजूंनी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी संजीव देशमुख यांनी केले आहे. यावेळी सुरेंद्र शिर्के उपस्थित होते.

Exit mobile version