तळा तालुक्यात पारंपरिक मिरवणूक

| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यात बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा साकारली होती. पारंपरिक खालू बाजा व लेझीम पथकाच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होते. यावेळी शिवजयंती निमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. शिवज्योत आणणे, महाराजांच्या प्रतिमेची स्थापना,पोवाडा,महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, महाआरती, व्याख्यान,मशाल महोत्सव यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Exit mobile version