| पनवेल । वार्ताहर ।
खड्ड्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी नवीन पनवेल व खांदा कॉलनी या ठिकाणच्या पनवेलला जोडणार्या महत्त्वाच्या दोन पुलांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण या कामांमुळे पनवेलमध्ये वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने पर्यायी मार्गाचा करण्याचे आवाहन करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे.
नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कलच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सिडकोमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. या पुलामुळे तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली गेली आहेत. तसेच नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे शेकडो वाहनांची येथे दररोज वाहतूक होत मात्र, पावसाळ्यानंतर या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पनवेलकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.