खेड्यापाड्यातील येणार्या नागरिकांची गैरसोय, नगरपंचायतीचे दुर्लक्ष
| सुधागड -पाली । वार्ताहर ।
पाली हे शहर अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. शहराची अंदाजे लोकसंख्या दहा ते बारा हजाराच्यावरती असून पाली शहर हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आसल्याने अजूबाजुच्या खेड्यापाड्यातील लोकांची शासकिय कामासाठी, खरेदी किंवा विक्रिसाठी खेड्यापाड्यातील लोक पाली येथे येत. याच प्रमाणे पाली शहरांमध्ये बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो संंख्येने भाविक येत असतात. पाली हे शहर विवेधतेने नटलेला असुन या पाली शहर सार्वजनिक शौचालया पासुन वंचित आहे.
पाली शहरात सार्वजनिक शौचालय हे पाली गणपती देवस्थांन व तहसिलदार कार्यलय, या ठिकाणी शौचालय आहेत. तहसिदार कार्यलय तसेच गणपती देवस्थान यांची शौचालय बाजारपेठे पासुन दुर असल्याने मोठी गैर सोय होत असते.
सुधागड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणजेच पाली बाजारपेठ असून गणपती, दिवाळी, होळी, ईद, लग्नकार्यपासूनची खरेदीसाठी लोक पालीत येत आसतात. त्यामुळे पालीत सतत वरदळ असते. शौचालयामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी खास करून महिला वर्गाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पाली नगरपंचायतीने मध्यवर्ती ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात यावे, अशी जोर धरत आहे. या गंभीर समस्यांबाबत पाली नगरपंचायतीने गांभीर्याने विचार करून सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी लावावे. लोकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी तालुक्यातील सर्व सामान्य जनता करत आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पाली नगरपंचायत निधी उपलब्ध होत असून आणि शहरांमध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची गरज आहे त्या ठीकाणी शौचालये बांधण्यात येतील.
विद्या येरुणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाली नगरपंचायत