आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुसळधार पावसामुळे सकाळपासूनच दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ती दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. तर दरड कोसळत असल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे. दरम्यान दरड काढण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version