| खांब-रोहा । वार्ताहर ।
मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असल्याने प्रवासीवर्ग व वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. पडलेल्या खड्ड्यांमुळे होणार्या वाहतूक कोंडीमुळे वेळ,पैसा व इंधन याचाही अपव्यय होताना दिसत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अगोदरच सर्व हैराण झाले असतानाच आता खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागल्याने सर्वांचे हाल होत आहेत. एक तासाच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास वेळ लागत असल्याने दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.