अलिबाग-रेवदंडा मार्गावर तूफान कोंडी

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग-रेवदंडा मार्गावर आज (दि.24) सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात लांबच-लांब रांगा लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. सलग चार दिवस सुट्या आल्याने पर्यटक मुरुडकडे निघाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.

शनिवार, रविवार, सोमवारी ख्रिसमस आणि मंगळवारी दत्त जयंती असल्याने सलगाच्या चार सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातील प्रवासी आणि पर्यटक हे नागांव, काशीद, मुरुडकडे जास्त प्रमाणात निघालेले आहेत. यामुळे अलिबाग-रेवदंडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील अलिबाग बायपास रोडपासून कुरुळपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा नाहक त्रास वाहन चालक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Exit mobile version