। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात पावसाची संततधार चालू असल्यामुळे नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नांदगाव येथील सरस्वती नदीवरील पुलावरून बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास पाणी गेल्यामुळे पाली-भिरा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला. पूलाच्या दोन्ही बाजूने बाजूला प्रवासी अडकून पडले होते. सरस्वती नदीने आपले रौद्ररूप धारण केल्यामुळे नदी किनार्यावरील गावांना प्रशासनाने सतर्कचा इशारा दिला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुलावरून पाणी जात असताना पुलावरून प्रवास करू नये, असे नांदगाव गोमाशीमधील स्थानिक तरुण मनोज शिंदे, उमेश मगर हे पुलाच्या दोन्ही बाजूकडील प्रवाशांना सांगत होते.