पनवेल-सायन मार्गावर वाहतूक कोंडी

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल-सायन मार्गावर पावसाळ्यापूर्वीची कामे रखडली असून, बेलापूर खिंड उड्डाणपुलाचे काम सिमेंट काँक्रीटीकरण अर्धवट राहिले आहे. सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने उरण फाटा परिसरात मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत आहे.

ऐन पावसाळ्यातही शीव पनवेल मार्गावरील बेलापूरखिंड उड्डाणपुलावरील खड्ड्यांचे काम रखडले होते. आयपीएल सामने असल्याने पूर्ण दुरुस्ती ऐवजी तात्पुरत्या डागडुजीवर भर दिला जात आहे. दोन दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना नियोजनाच्या अभावी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला झालेली मिळाली. सध्या उरण फाटा येथे खड्डे भरणीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा पाच किलोमीटर असलेल्या खारघर उड्डाणपुलापर्यंत लागल्या आहेत.

Exit mobile version