जनावरांची तस्करी करण्याचा प्रकार; पोलीसांना टेम्पो पकडण्यात यश

| नेरळ | वार्ताहर |

कत्तल करण्याचे इराद्याने गोवंशीय जनावरांची तस्करी करण्याचा प्रकार नेरळ पोलिसांनी उधळून लावला होता. जनावरे घेऊन जाणाऱ्या नाजीर तनवीर बुबेरे याला पोलिसांनी वाहनासोबत ताब्यात घेतले असून यात एका शेतकऱ्याचे नाव समोर आले आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी मोठ्या शिताफीने गोवंशीय जनावरे यांची सुटका केली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी चोरी केली होते. तर काही शेतकरी हे पैसे कमवण्यासाठी जनावरांची कत्तलीसाठी विक्री करता; परंतु कायद्याने गोवंशीय जनावरांची कत्तल करणे हा गुन्हा असल्याने या जनावरांची छुप्या पद्धतीने खरेदी विक्री केली जात असते.त्या जनावरांना रात्रीच्या वेळेत कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची गुप्त खबर गोरक्षक आणि पोलीस विभागाकडून 14 ऑक्टोबर रोजी नेरळ कळंब मार्गावर चिकनपाडा येथून मालेगावमार्गे निघालेले वाहन पुढे जाणार होते.

निरंजन दवणे या पोलीस शिपाई यांना एका पिकअप टेम्पोचा संशय आल्याने पकडले असता यात चार गोवंशीय जनावरे आढळून आली. ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी सतर्क राहत चालक नाजीर तनवीर बुबेरे याला पोलिसांनी वाहनासोबत ताब्यात घेतले. तर अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात 75 वर्षीय परशुराम कान्हू मोगरे या शेतकऱ्याचे नाव दुसरा आरोपी म्हणून समोर आले. हा शेतकरी वांगणी येथील कुडसावरे येथील राहणारा असून त्यांनी आपले चार जनावरे विक्रीसाठी दिली होती. या गुन्ह्यात नेरळ पोलिसांनी दोन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून तस्करीसाठी वापरलेली गाडी देखील ताब्यात घेतली आहे. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली असून पोलिसांनी त्या जनावरांची नेरळ येथील गोशाळेत रवानगी केली आहे. प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस करीत आहेत.

Exit mobile version