| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गांवरील सुकेली खिंडीतील उतारावरील अवघड वळणावर शनिवारी (दि.1) 2 वाजण्याच्या सुमारास कोलाडकडून नागोठणेकडे जाणाऱ्या ट्रेलर चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताची घटना घडली. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड बाजुकडून नागोठणे बाजुकडे जाणारा ट्रेलर सुकेली खिंडीच्या तीव्र उतार व अवघड वळणावर आला असता ट्रेलर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.