| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कोलाड-भिरा मार्गांवरील दुरटोली फाट्याजवळ मंगळवारी मध्यरात्री ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही. कोलाड-भिरा मार्ग पूर्णपणे डोंगरामधून जाणारा मार्ग असुन या मार्गांवर रस्त्याला जागोजागी वळणे आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या काही ट्रेलर चालकांच्या कानाला नेहमीच मोबाईल लावलेला असतो. त्यामुळे रस्त्याला असणाऱ्या वळणामुळे समोरून येणारी वाहने लक्षात येत नसल्याने वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो. यामुळे मार्गांवर नेहमीच अपघातात होत असतात. त्यामध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. विळे-निजामपूर येथे पोस्को कंपनी असल्यामुळे या मार्गावर नेहमी अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
दुरटोली फाट्याजवळ ट्रेलरला अपघात
