। पनवेल । प्रतिनिधी ।
ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत राहुलकुमार श्यामनारायण मिश्रा याचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात कंटेनर ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल कुमार हा त्याच्या दुचाकीने देना बैंक तळोजा एमआयडीसी येथून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना हिं डालको कंपनीसमोर कल्याणकडे जाणाऱ्या रोडवर तळोजा एमआयडीसी येथे भरधाव कंटेनर ट्रेलरचालकाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात राहुलकुमार याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







