कानाचे आजारावर प्रशिक्षण शिबीर

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद, नाशिक जिल्हा परिषद, यशश्री कान, नाक, घसा रुग्णालय, मिरज व स्वदेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांमधील कानाचे आजार या विषयावर रायगड व नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि आरोग्यसेविकांचे ऑनलाइन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर शुक्रवारी (दि.26) दुपारी 4 ते 5 या वेळेत पार पडणार असून, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. सुधीर कदम हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबीरात तहान मुलांमधील कानाचे आजार असलेल्या बालकांना कसे शोधून काढावे आणि त्यावर उपचार, सेवा याविषयी या प्रशिक्षण शिबिरात माहिती देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि आरोग्यसेविका यांनी या प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा, असे अवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण विभाग सभापती गीता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी केले आहे.

Exit mobile version