आदिवासी महिलांना सहकार मार्गदर्शन

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती आहे. आदिवासी समाजातील महिलांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मिती करावी, यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींकडून महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

कर्जत येथील गुड शेफर्ड संस्थेमार्फत आदिवासी महिलांना सहकारी संस्थेबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी सहकारी संस्थाची देण्यासाठी डी दिनेश उपस्थित होते. त्यांनी सहकारी संस्था कशा बनवायच्या, त्या संस्था कशा चालवायच्या तसेच सहकारी संस्था यांना अर्थ साहाय्य बँकांच्या माध्यमातून कसे मिळते, सभासद कसे सहभागी करून घ्यावेत आणि कोणत्या निकषावर संस्था स्थापन केली जाऊ शकते तसेच, त्यासाठी सभासद यांना कोणते नियम असणार, कोणत्या निकषांचे आधारे सभासद वाढवायचे आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन डी दिनेश यांनी केले. तर गुड शेफर्ड शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रेसी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आदिवासी महिलांसाठी सहकारी संस्थेचा उद्देशच महिला सक्षमीकरण हा आहे. त्यासाठी आदिवासी सहकारी संस्था यांना अर्थ साहाय्य करणारे अनेक पुढे येत आहेत. त्यामुळे आपली सहकारी जर सहकारी संस्था चालवत असेल तर त्याचा फायदा कर्ज लवकर मिळविण्यासाठी होऊ शकतो.

Exit mobile version