| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील काकळघर, कोर्लई, वेळास्ते, वावडुंगी या चार ग्रामपंचायत निवडणुक 18 डिसेंबरला होत आहेत. त्या निवडणूकीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे प्रशिक्षणाचे आयोजन दरबार हॉलमध्ये हसीलदार तथा निवडणूक अधिकारी -रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार-अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
चारही ग्रामपंचायत मतदार संघात मतदान सुरळीत पणे पार पाडण्यासाठी नेमणुकीला असलेले केंद्राध्यक्ष व अधिकारी यांनी मतदानापूर्वी , प्रत्यक्ष मतदानावेळी व मतदाना नंतर कसे काम करावे , मतदान यंत्र जोडणी, मतदान कक्ष,आदि विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मतदान यंत्राचे भाग,ईवीएम मशिन त्याची जोडणी , मतदानानंतर सीलबंद करणे यांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
या प्रशिक्षण वेळी मुरुड नायब तहसीलदार -रविंद्र सानप, नायब तहसीलदार-गोविंद कौटुंबे,सुग्रीव वाघ, विजय म्हापुसकर,खुषाल राठोड,रुपेश रुपेश रेवसकर, आदिंसह शिक्षक-शिक्षिका वर्ग उपस्थित होते.






