सेंद्रिय शेतीविषयी शेतकर्‍यांना प्रशिक्षण

। पाली /गोमाशी । वार्ताहर ।
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्यातील परळी येथे आदिम जमाती विकास व संवर्धन या योजनेंतर्गत सेंद्रिय शेती व पद्धती या विषयाचे प्रशिक्षण शुक्रवार, दि. 14 रोजी घेण्यात आले.

या प्रशिक्षणात उपस्थित शेतकर्‍यांना डॉ. एन.व्ही. म्हसकर प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत यांनी सेंद्रिय शेती व पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात जीवामृत, बीजामृत, सेंद्रीय खते तयार करण्याच्या पद्धती याबाबत सादरीकरण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच खोडकिडा नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वैभव विळ्याचे वाटप करण्यात आले. तसेच आधुनिक सेंद्रीय शेती या पुस्तकाचे वाटप करण्यात आले तालुका कृषी अधिकारी जे.बी. झगडे यांनी मार्गदर्शन केले तसेच आदिवासी विकास विभाग पेणचे प्रतिनिधी ए.एम. वारुळे यांनी त्यांच्या विभागात राबविलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली. शेवटी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या प्रशिक्षणाच्या वेळी डी.के. तळेगावकर मंडळ कृषी अधिकारी परळी, बी.डी. मराडे कृषी पर्यवेक्षक कुंभारघर, पी.व्ही. कल्याणे कृषी सहाय्यक तसेच प्रशिक्षणार्थी 90 शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे नियोजन प्राजक्ता पाटील, बीटीएम व एच.के. कोळी यांनी केले होते.

Exit mobile version