अंजुमन महाविद्यालयात ऊर्जा संवर्धनावर प्रशिक्षण


| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हरित ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा संवर्धन या विषयावर युवा वर्गासाठी संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. एन. एस. लिंगायत यांनी ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व सांगून दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा कमी वापर, अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून ऊर्जेचे संवर्धन कसे करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अल्ताफ फकीर यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version