सुमित्र पतसंस्थेतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन

| रेवदंडा | वार्ताहर |

रेवदंडयातील सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुमित्र पतसंस्थेचे कमळाकर साखळे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि.10 रोजी मोठे बंदर भंडारी समाज सभागृहात घेण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे, उपाध्यक्ष खलिल तांडेल, महेंद्र नाईक, उमेश कोंडे, राजेंद्र वाडकर, अशोक हवालदार, विजय चौलकर, सदानंद घरत, प्रतिभा वरसोलकर, कमरजब्बीन मुकादम, सलिम तांडेल, मालती ठाकूर, अशोक नागावकर, क्रांती जाधव, नरेश सुर्वे, अरूण गद्रेे उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था पुणे येथील प्राध्यापक एस.बी. वाटाणे यांनी सभासद, सहकारी, शिक्षण व प्रशिक्षण क्रार्यक्रम अंतर्गत संचालक, कर्मचारी, व सभासद यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे यांची अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर अध्यक्ष म्हणून निवड व पतसंस्थेचे उपाध्यक्ष खलिल तांडेल व सलिम तांडेल यांची अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार पतसंस्थेचे वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रांती जाधव यांनी केले.

Exit mobile version