ट्रेनिंग स्कूल्सचा आंदोलनाचा इशारा

। चिपळूण । प्रतिनिधी ।
महापुरात उद्वस्त झालेले चिपळूण शासन तथा विविध संस्था यांच्या मदतीमुळे स्थिरस्थावर होत आहे. मात्र, तालुक्याला जाहीर करण्यात आलेल्या मदतीचा हाथ ट्रेनिंग स्कूल यांच्यापर्यंत न पोहल्यामुळे संतप्त झालेल्या संचालकांनी आगामी काळात ही मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे चिपळूण पूर्णतः उद्वस्त झाले होते. यावेळी शासन आणि सेवाभावी संस्था यांनी शक्यतेनुसार मदत जाहीर केली. अर्थातच, यामध्ये शासनाचे योगदान सर्वाधिक होते. पण या शासकीय मदतीचे वितरण करताना दुजाभाव करण्याचा आरोप चिपळूणमधील ट्रेनिंग स्कूलद्वारे करण्यात आला आहे.
शासनाने दिलेल्या मदतीमध्ये ट्रेनिंग स्कुलसाठी तरतुद करण्यात आली नव्हती. मात्र, असे असताना येथील काही टे्रनिंग स्कुलला शासनाची मदत मिळाली आहे. यासंदर्भाने मदत मिळण्यासाठी मदतीपासून वंचिन असणारे ट्रेनिंग स्कुलचे प्रतिनिधी सातत्याने तहसील कार्यालयाच्या फेर्‍या मारत आहेत. पण त्यांना आवश्यक तो प्रतिसाद संबंधित आस्थापनेकडून मिळत नसल्याचे चित्र आहे.
याच पार्श्‍वभूमीवर मदतीपासून वंचित असणार्‍या ट्रेनिंग स्कूल्सना शासकीय मदत देण्यात याची, अन्यथा याविरोधात आंदोलन करू, असा इशारा क्रॉऊन मोटर्सचे मालक इब्राहिम सरगुरो यांनी दिला आहे.

Exit mobile version