पोलादपूरमध्ये शेतकर्‍यांना प्रशिक्षण

| पोलादपूर | वार्ताहर |

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक जैविक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी शेतकरी गट कंपनीचे संचालक नारायण महाराज कळंबे व नवनियुक्त संचालक तसेच, पोलादपूर तालुक्यातील शेतकरी गटांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी डॉ. जीवन आरेकर यांनी सेंद्रिय शेती प्रत्यक्षात शेतात कशा प्रकारे करावी याबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी शेतकरी गटांची कार्यपध्दतीविषयी माहिती दिली, तसेच रविंद्र गुंड यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व या विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांनी सुध्दा चर्चासत्रात भाग घेवून नारायण कळंबे, हनुमंत दळवी, जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी केले कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल वालेकर, मनोज जाधव, बरकडे, डासालकर, काकड, खराडे, श्रीमती कचरे, कृषी सहाय्यक मोमीन व श्रीरंग मोरे, नितीन धायगुडे, कृषी पर्यवेक्षक रविंद्र गुंड यांनी सहकार्य केले.

Exit mobile version