सुपारी संघावर एकताचे परिवर्तन

विरोधकांचा झाला दारुण पराभव
| आगरदांडा | प्रतिनिधी |
करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल असणार्‍या मुरुड तालुक्यातील सुपारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत एकता परिवर्तन पॅनेलने प्रामाणिक व कार्यतत्पर पॅनेलचा दारुण पराभव केला आहे. दोन्ही गटाकडून सदरची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर व शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत व सुधीर पाटील यांनी विजयश्री खेचून आणून सुपारी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

गेली अनेक वर्षे चेरअमनपद भूषविलेले अविनाश दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक परिवर्तन पॅनेलने लढवली. प्रामाणिक पॅनलतर्फे मुरुड तालुका शिंदे गट शिवसेना प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर तसेच सुपारी संघाचे विद्यमान चेरमन महेश भगत, माजी नगरसेवक संजय गुंजाळ या लोकांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत सहा सदस्य याअगोदर बिनविरोध निवडून आले होते. 11 सदस्य निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनीही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. परंतु, मतदारांनी सत्ताधारी प्रामाणिक व कार्यतत्पर पॅनलला धुडकावून एकता परिवर्तन पॅनेलला 11 पैकी दहा सदस्य निवडून देऊन पूर्ण बहुमत त्यांना बहाल केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधक चारीमुंड्या चीत झाले आहेत.इतर मागास प्रवर्गातून प्रवीण चौलकर विरुद्ध विद्यमान चेरमन महेश भगत यांच्या सरळ लढत झाली यामध्ये प्रवीण चौलकर यांना 424, तर महेश भगत यांना 314 मते मिळाली आहेत. चौलकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

मुरुड शहरातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे होते. हे सातही उमेदवार परिवर्तन पॅनलचे निवडून आले आहेत. मुरुड शहरातून अविनाश दांडेकर, अविनाश भगत, जनार्दन कंधारे, अमोल उपाध्ये, विनोद भगत, प्रकाश रणदिवे, हिफाजू रहेमान दर्जी हे विजयी झाले आहेत. दर्जी व संजय गुंजाळ याना समसमान मते मिळाली होती. त्यावर सहाय्य्क निबंधक श्रीकांत पाटील यांनी ईश्‍वर चिठ्ठीद्वारे दोघांच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या. त्यामधून दर्जी यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. विमुक्त भटक्या जाती व विशेष मागास वर्ग प्रजातीमधून विकास दिवेकर याना 391 मते मिळाली, तर नथुराम महाडिक यांना 343 मते मिळाली. जास्त मते असणारे दिवेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीमधून डॉ. अमित बेनकर यांना 369 मते मिळाली, तर श्रीकांत नांदगावकर यांना 367 मते मिळाली. प्रामाणिक कार्यतत्पर पॅनेलचे डॉ. बेनकर हे विजयी झाले आहेत.

सदरील निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी अतिक खतीब, सुभाष महाडिक, अ‍ॅड. इस्माईल घोले, फैरोज घलटे, सुधीर पाटील, अजित कासार, तमीम ढाकम, विजय भोय, विजय पैर, ताबिश ढाकम, रमेश चौलकर, प्रभाकर मसाल, सुधीर माळी, प्रकाश विरकुड, संजय डांगे, नरेंद्र हेदुलकर, संतोष पाटील, बाबासाहेब अर्जबेगी, राहील कडू, हसमुख जैन, उमेश माळी, जावेद हदादि, प्रमिला माळी, अ‍ॅड. मृणाल खोत, मनीष माळी, मुजफ्फर सुर्वे, राजू पोतनीस इत्यादींनी परिवर्तन पॅनल विजयासाठी परिश्रम घेतले.
000000000000000

Exit mobile version