उरणमध्ये ट्रान्स्फाॅर्मर जळला; विद्युत वाहक तार तुटली

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (दि 4) संध्याकाळी ट्रान्सफॉर्मर जळण्याची दुदैवी घटना घडली.तसेच खोपटा बस स्थानकाजवळ विद्युत वाहक तार तुटूल्याची दुदैवी घटना घडली.या घटनेत जीवित किंवा विकत हानी झाली नसली तरी गावो गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला.
   

अशा घटना संदर्भात महावितरण कार्यालयाकडे विचारणा केली असता येथील अभियंता हे त्यांच्या तोर्‍यात राहून उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे उरण तालुक्यात वारंवार घडणार्‍या अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महावितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता यांनी जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली आहे.

Exit mobile version