कॉईल ट्रेलरची वाहतूक नागरिकांच्या जिवावर

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील वरसगांव फाट्यावरून विळे भागाड येथील पोस्को कंपनीकडे कॉईल वाहतूक करणारे ट्रेलर खाली कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वरसगांव फाट्यावरून विळेकडे जाणारा मार्ग हा पूर्णपणे डोंगर दऱ्या व वेडी वाकडी वळणांनी व्यापला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची हमखास शक्यता असते. वरसगांव ते विळे भागाड येथे पोस्को कंपनीकडे कॉईल भरून जाणारे बहुतांश ट्रेलर चालक हे मोबाईलवर बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष जात नाही आणि अपघाताच्या घटना घडतात. त्यामध्ये निरपराध नागरिकांचा बळी जातो. हा रस्ता रुंद करण्यात यावा, नाही तर या मार्गावरील कॉईल ट्रेलरची वाहतूक थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विश्वास बागुल यांनी दिला आहे.

Exit mobile version